इगतपुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन होणार ; २० पदनिर्मितीसही मान्यता : जिल्हा स्तरावर चालणारे दावे इगतपुरीत चालण्याचा मार्ग मोकळा

ॲड. सुनील कोरडे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 12 इगतपुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे दिवाणी न्यायालय ( वरिष्ठ स्तर ) स्थापन करण्यात येईल. यासाठी २० पदांना मान्यता देण्यात आली आहे. याकरिता ९८ लाख ८३ हजार ७२४ […]

“ह्या” महिन्यात होऊ शकते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक : आरक्षणावर “काय” होईल परिणाम ?

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद गटांची संख्या पूर्वीप्रमाणे करण्याबाबत अध्यादेश प्रसिद्ध झाला. मात्र ह्या निर्णयामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कमीतकमी 5 महिने लांबणीवर जाऊन पडल्या आहेत. नव्याने निर्माण केलेल्या गट आणि गणात तयारी करून बसलेल्या अनेक उमेदवारांना यामुळे चांगलाच फटका बसला आहे. आतापर्यंत केलेला खर्च वाया गेला […]

दुखणे आरक्षणाचे – जिल्हा परिषद गटांची नवी रचना रद्द ; जुनी रचना कायम ? : काढलेले आरक्षण रद्द करून नव्याने निघणार आरक्षण ?

इच्छुक उमेदवारांचे धाबे दणानले ; काहींना फुटले धुमारे इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील जिल्हा परिषदांची गटरचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत वाढलेले गट कमी करून पूर्वीच्या जुन्या गटांची रचना कायम करण्यात येणार आहे. परिणामी मागील आठवड्यात काढलेले आरक्षण मातीमोल ठरणार आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने आरक्षण काढण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागेल. अनेक […]

२० मार्चपासून विद्यमान सदस्य होणार ❝माजी झेडपी सदस्य❞ : प्रशासकीय राजवटीमुळे ७२ सदस्यांना व्हावे लागणार सामान्य नागरिक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ येत्या २० मार्चला नाशिक जिल्हा परिषदेची पाच वर्षाची मुदत संपुष्टात येणार आहे. परिणामी २० मार्चपासून ७२ जिल्हा परिषद सदस्य असणारे लोकप्रतिनिधी “माजी जिल्हा परिषद सदस्य” म्हणून ओळखले जाणार आहे. अनेक कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे विद्यमान सदस्यांना मुदतवाढ मिळेल अशी कारणे सांगून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी ठेकेदारांकडून निवडणूक निधी लाटत असल्याची […]

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, याबाबत विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.विधान परिषदेत  ओबीसी आरक्षण प्रश्नावर  नियम २८९ अन्वये चर्चेला उत्तर देताना  उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. सभागृहातील सर्वच सदस्य […]

जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्तीसाठी पुढील आठवड्यात निर्णय ? : मुंबई मनपावर प्रशासक नेमण्याचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे वाढली आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती कायद्यात विद्यमान सदस्यांना मुदतवाढ देण्याची तरतूद नसल्याने प्रशासकाची नियुक्ती होणे जवळपास निश्चित झाले असल्याचे समजते. बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. […]

ब्रेकिंग न्यूज : सोमवारपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारची सशर्त परवानगी

इगतपुरीनामा न्यूज दि. २० : जेमतेम काही दिवस सुरू असलेल्या राज्यातील शाळा कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आज झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत येत्या सोमवार पासून राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली असून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून […]

नवा जिल्हा परिषद गट कोणता होणार ? कोणती गावे होतील समाविष्ट ? अन्य गटातील कोणती गावे कुठे होतील समाविष्ट ?

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची संख्या वाढवण्याचा निर्णय नुकताच झाला. इगतपुरी तालुक्यात विद्यमान परिस्थितीत ५ जिल्हा परिषद गट आहेत. या निर्णयामुळे इगतपुरी तालुक्यात एका नवीन जिल्हा परिषद गटाची भर पडणार आहे. अर्थातच पंचायत समितीचे २ गण सुद्धा वाढणार आहेत. नवा जिल्हा परिषद […]

इगतपुरी तालुक्यात वाढणार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण : गावांची अदलाबदल करूनच नवे गट आणि गण होणार : आरक्षणावर दूरगामी परिणाम होणार असल्याने वाढला संभ्रमच संभ्रम

लेखन : भास्कर सोनवणे : मुख्य संपादक, इगतपुरीनामा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण प्रक्रिया अद्याप प्रलंबित असतांना मंत्रिमंडळाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात १ किंवा २ गट आणि ४ किंवा ५ गण वाढणार असल्याचा अंदाज आहे. यासह गट गणांची पुनर्रचना आणि गावांच्या अदलाबदलीची प्रक्रिया सुद्धा होणे […]

खुशखबर : मनपा, नगरपरिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ : राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढवण्याला मंत्रिमंडळाची मान्यता

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ मनपा, नगरपरिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल. मनपा, नगरपरिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राखीव जागांवर […]

error: Content is protected !!