भिकाजी गोपाळा खोसकर यांचे निधन ; आमदार हिरामण खोसकर यांना पितृशोक

इगतपुरीनामा न्यूज – नाईकवाडी ( गिरणारे ) ता. नासिक येथील भिकाजी गोपाळा खोसकर वय ८५ यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे  आमदार हिरामण खोसकर साहेब यांचे ते वडील होते. आज सायंकाळी ४ वाजता भिकाजी खोसकर यांच्यावर नायकवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सहभागी असलेले आमदार हिरामण […]

नाशिप्र मंडळ आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेत टिटोली जिल्हा परिषद शाळेचे सुयश

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय Computalent Search Compititive 2023 या स्पर्धेत जिल्ह्यातुन एकमेव टिटोली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले. नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कुलमध्ये बक्षिस समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत जिल्ह्यातील ७८ शाळांच्या ४ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात टिटोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी […]

बोरकुंडचे कृषिमित्र वसंतराव भदाणे यांच्या अंत्ययात्रेत खांदेकरी झाल्या सुना, बहिणी व मुली : कुंकू पुसणे, बांगड्या फोडण्याला तिलांजली देत केला विधवा सन्मान : मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, भदाणे कुटुंबाचा पुढाकार

इगतपुरीनामा न्यूज – मरण आणि तोरण प्रसंगात अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी,परंपरांमुळे समाजाचे प्रचंड नुकसान होते. दुःखद प्रसंगात विधवा महिलेला अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने महिलांचे खच्चीकरण व अपमान होतो. या चुकीच्या रूढी परंपरेमधून समाज मुक्त व्हावा यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड सातत्याने प्रयत्न करत आहे. याची सुरुवात धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथून करण्यात आली. प्रगतशील शेतकरी वसंतराव […]

लक्ष्मीबाई चौधरी यांचे निधन

इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथील लक्ष्मीबाई शंकर चौधरी वय८५) वर्ष यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गोंदे दुमाला येथील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ बोराडे यांच्या भगिनी होत.

इगतपुरी तालुक्याचे जेष्ठ पत्रकार राजीव गुप्ते सर यांचे निधन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या आदिवासी भागातील समस्यांना परिणामकारक वाचा फोडून ते सोडवणारे हाडाचे पत्रकार राजीव रमाकांत गुप्ते ( सर ) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. दैनिक सकाळच्या माध्यमातून टाकेद बुद्रुक येथून त्यांनी अनेक वर्ष पत्रकारिता केलेली आहे. टाकेद बुद्रुक येथील न्यू इंग्लीश स्कूलचे ते निवृत्त मुख्याध्यापक असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना यशासाठी मौलिक मार्गदर्शन […]

सतत रामकृष्णहरी मंत्राचा उच्चार करणारा कट्टर वारकरी हरपला : संस्कारक्षम पिढी घडविणारे पहिलवान वै. एकनाथ यशवंत सहाणे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील नावाजलेले पहिलवान  वै. एकनाथ सहाणे यांच्या वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. वै. एकनाथ सहाणे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करीत कुस्ती क्षेत्र व वारकरी सांप्रदायात नावलौकिक मिळवलेला आहे. त्यांनी खाजगी कंपनीची ३० वर्षे नोकरी सांभाळून मुलांना वारकरी शिक्षणाचे बाळकडू देत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मोठे कष्ट […]

शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक डॉ. मो. स. गोसावी सर अनंतात विलीन

इगतपुरीनामा न्यूज – शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक डॉ. मो. स. गोसावी ह्यांचे ९ जुलैला वयाच्या ८८ व्या वर्षी देहावसान झाले. शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना मास्टर टीचर मिलेनियम, भारतरत्न लता मंगेशकर ह्यांच्या हस्ते विद्या सरस्वती अवार्ड, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र भूषण अवार्ड , ज्ञानहीरा, राजीव गांधी […]

वारकऱ्यांचे लाडके वै. शत्रुघ्न महाराज गतीर – इगतपुरी तालुक्यातील अनमोल रत्न पांडुरंगचरणी विलीन

लेखन – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा पवित्र ते कुळ पावन तो देशजेथे हरिचे दास जन्म घेतीअसे सर्वच संतांचे सिद्ध झालेले प्रमाण आहे. ह्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका सुद्धा मागे नाही. ह्या तालुक्यात विविध रत्नांची खाण आहे. ह्यापैकी अत्यंत महत्वाचे अनमोल असणारे एक रत्न हभप शत्रुघ्न महाराज महादु गतीर हे १ एप्रिल २०२३ ला वैकुंठवासी झाले. […]

संस्कार, संस्कृती आणि संतत्वामध्ये आयुष्य जगलेले आधुनिक संत वैकुंठवासी हभप रुंजाबाबा गुळवे

लेखन : भास्कर सोनवणे, संपादक महाराष्ट्राला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडित ठेवण्याचे काम आधुनिक काळातील संतस्वरूप महात्मे करीत असतात. पांडुरंग परमात्म्याची सेवा करतांना तोच विठोबा प्रत्येक जीवामध्ये शोधण्याचे कसब सुद्धा ह्याच साधकांकडून होते. वाया जाऊ देऊ नये एक क्षण.. भक्तीचे लक्षण जाणावे हे याप्रमाणे जीवनातील प्रत्येक मिनिट हरिभक्ती करणारे विरळेच.. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील […]

इगतपुरीच्या भाजपा नगरसेविका साबेरा पवार यांचे निधन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ : इगतपुरी नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या साबेरा पवार यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. भाजपाचे इगतपुरी तालुका उपाध्यक्ष मुन्ना पवार यांच्या त्या मातोश्री होत्या. इगतपुरी नगरपरिषद निवडणूक २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक ५ ब मधून भाजपाच्या तिकीटावर त्या निवडून आल्या होत्या. पाच वर्षाच्या काळात इगतपुरी शहरातील विविध विकासाच्या कामात त्यांचे मोलाचे योगदान होते. […]

error: Content is protected !!