
इगतपुरीनामा न्यूज – आगरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणपतराव कडू ( वय ८५ ) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. आगरी समाजाचे जागरूक नेते म्हणून ते राज्यभर ओळखले जातात. मोठा जनसंपर्क, समाजावर भक्कम पकड आणि समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी दूरदृष्टीचे नियोजन ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य, घोटी ग्रामपालिकेचे सरपंच आणि घोटी मर्चंट बँकेच्या संस्थापक मंडळातही ज्येष्ठ नेते गणपतराव कडू यांनी पद भूषवलेले आहे. त्यांच्या निधनामुळे आगरी समाज आणि इगतपुरी तालुक्याची भरून न निघणारी मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. आगरी समाजाचे भक्कम आधारस्तंभ गणपतराव कडू यांच्या निधनामुळे इगतपुरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दुपारी ४ वाजता घोटी येथे अंत्यविधी होणार आहे.