इगतपुरीनामा न्यूज – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताची खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था जागतिकीकरण खाजगीकरणाच्या माध्यमातून पटरीवर आणली. ह्या जागतिक दर्जाच्या अर्थतज्ञाने अन्न सुरक्षा कायदा, मनरेगा भुमी अधिग्रहण कायदा, वनाधिकार कायदा या जनसामान्यांच आणि गरिबांचे आयुष्य बदलणाऱ्या महत्वाच्या सुधारणा केल्या. हा भारताचा कोहिनूर हिरा गमावला असुन त्यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी केले. भारताचे माजी पंतप्रधान तथा अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना इगतपुरी तालुका वासियांच्या वतीने शहरातील सुगत बौध्दविहार येथे भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्याप्रसंगी आदिवासी नेते लकीभाऊ जाधव बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे, मल्हारी गटखळ, तालुका संघटक सत्तार मणियार, निवृत्ती कातोरे, धनंजय भोसले, चंद्रकांत गाडे, वसंत गवळे, मधुकर जाधव, भिमराव शिंदे, विजय मनोहर, शरद शिंदे, संदीप गवारे, दौलत मेमाने, गोविंद सावंत, सोमनाथ आगविले, याकुब खान, संतोष आगविले, एकनाथ तेलम, प्रकाश वारघडे, विजय पोटकुले, प्रकाश गावंडा आदी उपस्थित होते. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्धल केलेल्या विधानाच्या विरोधात काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन होणार होते. मात्र हे आंदोलन स्थगित करून श्रद्धाजली सभा घेण्यात आली.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group