पुष्पा फलटणकर यांचे निधन ; किरण फलटणकर यांना मातृशोक

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील पुष्पा पद्माकर फलटणकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांच्या त्या मातोश्री होत्या. काही महिन्यांपूर्वी सौ. मनीषा किरण फलटणकर यांचे आकस्मिक निधन झाले होते. आज पुन्हा ह्या कुटुंबावर दुःखाची वेळ आली आहे. पुष्पा पद्माकर फलटणकर यांची अंत्ययात्रा आज रविवार दि. २८ रोजी संध्याकाळी ६ वाजता इच्छामणी गणपती मंदिरासमोर नवा बाजार, इगतपुरी ह्या त्यांच्या राहत्या घरापासुन निघेल. इगतपुरी तालुक्यातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!