भिकाजी गोपाळा खोसकर यांचे निधन ; आमदार हिरामण खोसकर यांना पितृशोक

इगतपुरीनामा न्यूज – नाईकवाडी ( गिरणारे ) ता. नासिक येथील भिकाजी गोपाळा खोसकर वय ८५ यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे  आमदार हिरामण खोसकर साहेब यांचे ते वडील होते. आज सायंकाळी ४ वाजता भिकाजी खोसकर यांच्यावर नायकवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सहभागी असलेले आमदार हिरामण खोसकर तातडीने नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शोक व्यक्त केला आहे. 

Similar Posts

error: Content is protected !!