इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन दिवसांपूर्वी मुंबईहून आल्यानंतर त्यांना ताप, सर्दी, अंगदुखी असा त्रास सुरु झाला. त्यांचे चिरंजीव वामन खोसकर ह्यांच्यावर सध्या डेंग्यूचे उपचार सुरु आहेत. म्हणून आपल्याला डेंग्यू असल्याचा संशय आल्याने आमदार खोसकर यांनी वैद्यकीय उपचार घेतले. यासाठी हॉस्पिटलने केलेल्या कोरोना तपासणीनुसार त्यांना […]
इगतपुरी : वैयक्तिक आरोग्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे, आणि प्रत्येकाने ती काटेकोरपणे पार पाडली पाहिजे असे आवाहन मुख्याध्यापक मनोज गोसावी यांनी केले. तळेगाव येथील संजीवनी आश्रमशाळेत आज (दि. १८) धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण शिबीर घेण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेतील […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. शैलेश देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी अतिदुर्गम भागातील शेकडो रुग्णांना दिलेल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचा हा गौरव समजला जात आहे. इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध गावांतून सर्व क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी डॉ. शैलेश देशपांडे यांचे अभिनंदन केले आहे. वैद्यकीय आघाडीच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 29 इगतपुरी शहरातील श्री साई सहाय्य समिती, प्रभुनयन फाउंडेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमाने रकबी द फर्न हॉटेल येथे कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न झाला. राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. एसएमबीटी रुग्णालयाचे डॉ. संतोष पवार, डॉ. सुरज कडलग, संतोष भोसले, रफिक […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या कोरोनाकाळातील कामगिरीबाबत सातत्याने अनेकांकडून माहिती दिली जात होती. याबाबत त्यांची भेट झाल्यावर त्यांचे विशेष कौतुक केले होते. अशा सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाला पुरस्काराने सन्मानित करतांना अत्यानंद होत आहे. आदिवासी समाज बांधव आणि समाजाच्या सर्व घटकांसाठी कोविड काळात 24 उपलब्ध असणारे गोरख बोडके सन्मानाला पात्र आहेत असे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ महिला आणि बालकांचे सर्वांगीण हित डोळ्यासमोर ठेवून अखंडित सेवा करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील आशासेविकांचा मला अभिमान वाटतो. महामारीच्या खडतर काळात त्यांनी खांद्याला खांदा लावून केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. पायाला भिंगरी बांधून निव्वळ जनसेवा करून आशासेविकांनी लोकांची मने जिंकली आहेत. माझ्या देशभरातील सर्व आशाताई आणि अनेक संबंधित कोरोना योद्धेही सन्मानाला पात्र आहेत असे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानने सुरु केलेला उपक्रम अतिशय उपयुक्त असून यामुळे अनेक महिला आणि बालकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. सर्वांच्या सहभागाने कुपोषण मुक्त भारत होण्यासाठी आपण समाजाला प्रभावी दिशा देणारी चळवळ उभी करायला हवी. आपली भावी पिढी सदृढ निर्माण होण्यासाठी प्रत्येक नागरिकांने सजगतेने ह्या उपक्रमात झोकून देऊन […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० इगतपुरी तालुक्यातील एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमांतर्गत नाभिक समाजातील गरीब विद्यार्थ्यांना सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. घोटी येथील श्री संत सेना महाराज मंदिरात ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता १ ते १० वी मधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा ३ वर्षाचा शालेय शिक्षणाचा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० छत्रपती शिवरायांचे विचार दगडालाही मोती बनवु शकतात. ह्या विचारांच्या सुसंस्कारांची पेरणी प्रत्येक माणसात व्हावी. शिवरायांच्या विचारांसह सामाजिक कार्याचा ठसा उमटवावा. यासाठी इगतपुरी तालुक्यातील रुपेश हरिश्चंद्र नाठे हा ध्येयवेडा युवक झपाटून काम करीत आहे. संपूर्ण कुटुंब आणि सहकारी मित्रांसह कामाला झोकून घेतलेल्या ह्या युवकाच्या प्रेरणादायी कार्याची दखल आशिया खंड स्तरावरील संघटनेने घेतली […]
सुनील शिंदे : इगतपुरीनामा न्यूज दि. २८ कोरोनाची साथ सुरू असतांना आजारात केवळ वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू पावलेल्या काशिनाथ भालेराव यांचा वर्षश्राद्ध कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भालेराव यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी उपस्थित नातलग, मित्रमंडळी आणि आप्तस्वकीय यांना वड आणि पिंपळ वृक्षांची अनोखी भेट दिली. ऑक्सिजन अभावी वडिलांचा झालेला मृत्यू धक्कादायक होता. […]