इगतपुरी तालुक्यातील आशा सेविकांच्या अभिमानास्पद कार्याचे केंद्रीय मंत्री ना. डॉ. भारती पवार यांनी केले कौतुक : घोटी येथील कार्यक्रमात आशा सेविकांकडून ना. पवार यांचे अनोखे स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

महिला आणि बालकांचे सर्वांगीण हित डोळ्यासमोर ठेवून अखंडित सेवा करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील आशासेविकांचा मला अभिमान वाटतो. महामारीच्या खडतर काळात त्यांनी खांद्याला खांदा लावून केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. पायाला भिंगरी बांधून निव्वळ जनसेवा करून आशासेविकांनी लोकांची मने जिंकली आहेत. माझ्या देशभरातील सर्व आशाताई आणि अनेक संबंधित कोरोना योद्धेही सन्मानाला पात्र आहेत असे कौतुक भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. डॉ. भारतीताई पवार यांनी घोटी येथे केले. ओमानंदनगर येथे श्री रामकृष्ण आरोग्य संस्थांनच्या विशेष कार्यक्रमात त्यांनी आशा सेविकांच्या कार्याबद्धल विविध प्रकारे कौतुक केले.

केंद्रीय राज्यमंत्री ना. डॉ. भारतीताई पवार यांचे इगतपुरी तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी स्वयंस्फूर्तीने औक्षण केले. यावेळी अक्षदा टाकून झालेले अनोखे स्वागत ना. डॉ. पवार यांनी स्वीकारले. आशा पर्यवेक्षिका सौ. विद्या जाधव यांनी यावेळी ना. पवार यांचे स्वागत केले. यावेळी आशा पर्यवेक्षिका सौ. विद्या जाधव, संगिता सदगिर, रेखा जाधव, किरण अग्रवाल, ज्योत्स्ना शेवाळे, सारिका उन्हवणे, गौरी जाधव, नंदा यंदे, राधिका दिवटे, अनिता खातळे, मनिषा क्षिरसागर, ज्योती टोचे, तालुका समुह संघटक किशोर सोनवणे यांच्यासह आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!