डॉ. शैलेश देशपांडे यांची भाजपा वैद्यकीय आघाडीच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. शैलेश देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी अतिदुर्गम भागातील शेकडो रुग्णांना दिलेल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचा हा गौरव समजला जात आहे. इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध गावांतून सर्व क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी डॉ. शैलेश देशपांडे यांचे अभिनंदन केले आहे. वैद्यकीय आघाडीच्या पदामुळे अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली असून यापुढेही चांगले काम करण्यासाठी बांधील आहे अशी प्रतिक्रिया नूतन जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शैलेश देशपांडे यांनी व्यक्त केली.

भाजपा वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपाचे नाशिक जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर, सरचिटणीस सुनील बच्छाव, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. वैभव जोशी, डॉ. नायपूर चंद्रशेखर, डॉ. घनश्याम बऱ्हे, गजानन पवार, प्रमोद वानखेडे आदींनी डॉ. शैलेश देशपांडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. देशपांडे यांना भेटून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. देशभक्ती व समर्पणाच्या भावनेने डॉ. शैलेश देशपांडे यांनी जागतिक वैश्विक महामारी कोविड काळात अतिशय दिमाखदार कामगिरी केली आहे असे कौतुक भाजपा वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांनी नियुक्तीपत्र देतांना केले.

Similar Posts

error: Content is protected !!