श्री साई सहाय्य समिती, प्रभुनयन फाउंडेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. 29

इगतपुरी शहरातील श्री साई सहाय्य समिती, प्रभुनयन फाउंडेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमाने रकबी द फर्न हॉटेल येथे कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न झाला. राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. एसएमबीटी रुग्णालयाचे डॉ. संतोष पवार, डॉ. सुरज कडलग, संतोष भोसले, रफिक शेख ह्या कोरोना योद्ध्यांनी महामारी काळात अहोरात्र गोर गरिबांची वैद्यकीय सेवा केली. त्यांच्या कार्याचा सन्मान ह्या कार्यक्रमात करण्यात आला. याप्रसंगी डॉ. जीवनज्योती कंदेवाड, इगतपुरीचे नगरसेवक योगेश चांडक, रकबी हॉटेलचे जनरल मॅनेजर बाबुराव दिघे, श्री साई सहाय्य समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू देवळेकर, अभय पार्टे, नितीन चांदवडकर, सुमीत बोधक, शैलेश पुरोहित, गणेश घाटकर, उमेश आढाव आदी उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!