मिलेट महोत्सवाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उदघाटन : २१ फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – सोमठाणे येथील शिवसरस्वती फाउंडेशन आणि कृषी विभागातर्फे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत मिलेट महोत्सवाला कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कार्यक्रमाप्रसंगी नाशिकचे विभागीय कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगदीश पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे आदी उपस्थित होते. विक्री व्यवस्थेत मध्यस्थ कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात दर्जेदार शेतमाल मिळावा या उद्देशाने ह्या महोत्सव होत असल्याबद्धल कृषिमंत्री ना. कोकाटे यांनी कौतुक केले. बचत गट उत्पादने, पौष्टिक तृणधान्य विक्री व प्रदर्शनाला यावेळी सुरुवात झाली. सिन्नर येथील वंजारी समाज मैदानावर फेब्रुवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ ह्या वेळेत महोत्सव सुरु राहणार असून भरडधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांची खरेदी करण्याची संधी सोडू नका असे आवाहन करण्यात आले. २१ फेब्रुवारीला परिसंवाद, पाककला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून उत्पादक, खरेदीदार विक्री संमेलन व समारोप होईल. नागरिकांनी मिलेट खरेदी, विविध कार्यक्रमासह मिलेट महोत्सवाचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिकचे उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी जयंत गायकवाड, सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, राजपूत मॅडम, महेश वेठेकर, रामदास मडके आदी अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!