
इगतपुरीनामा न्यूज – मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द व चौरेवाडी येथील बालभैरवनाथ आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या प्रगतीपथावरील कामास जलसंधारण महामंडळ छ. संभाजी नगरचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल कुशिरे यांनी भेट देऊन क्षेत्रीय पाहणी केली. कडवा धरणातुन पाणी उपलब्ध असलेल्या सिंचन योजनेच्या जॅकवेलचे काम व वितरण व्यवस्थेची त्तांनी पाहणी करून कामाबद्दल मार्गदर्शक सूचना आणि गुणवत्तापूर्वक केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. ही योजना आदिवासीबहुल भागातील असून मान्यते अभावी खुप काळ रेंगाळलेली होती. या योजनेला जलसंधारण महामंडळ छ. संभाजीनगर यांच्याकडुन गेल्या वर्षी ६.९० कोटी रुपये रक्कमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. गेल्यावर्षी ह्या योजनेचे भूमिपूजन तत्कालीन आमदार विद्यमान कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले होते. भैरवनाथ आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजनेमुळे भरवीर खुर्द व चौरेवाडी भागाचा विकास होईल. जवळच असलेल्या समृद्धी महामार्गामुळे मुंबईसह इतर शहराची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ मिळेल. शेती उत्पादनाला चालना मिळेल याबद्दल व्यवस्थापकीय संचालक सुनिल कुशिरे यांनी समाधान व्यक्त केले. ही योजना यावर्षी पूर्ण करुन शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ द्यावा, शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्या अशा सूचना त्यांनी दौऱ्यावेळी दिल्या. ह्या योजनेमूळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी देण्याची व्यवस्था असुन शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन राष्ट्रीय उत्पन्न वाढवावे असे आवाहन त्यांनी केले. ही योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्याबाबत चाचपणी करुन त्यांनी याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना केल्या. एप्रिल २०२५ अखेर भरवीर खुर्द व चौरेवाडी येथील दोन्ही योजना पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी विभागाला दिल्या. यावेळी नाशिक विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत, राजेंद्र शिंदे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, ठेकेदार मोहन गोडसे, निवृत्त अभियंता अविनाश लोखंडे आदींसह सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. २ योजनांची वैशिष्ट्ये बालभैरवनाथ आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजना चौरेवाडी व भरवीर खुर्द. लाभश्रेत्र – 234 व 249 हेक्टर, पंपाची संख्या 5+5 ( ५० HP क्षमता), विसर्ग 122 +124 लिटर / सेंकद लाभार्थी शेतकरी संख्या 154 + 167 शेतकरी