किरण रायकर : इगतपुरीनामा न्यूज – शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यत जलद गतीने परिणामकारकपणे पोहचविता यावा. यासह कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रीस्टॅक ( डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर ) योजना राज्यात राबवण्यात येत आहे. या योजनेनुसार इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करुन शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी दिल्या. ॲग्रीस्टॅक योजनेबाबत बैठकीवेळी तलाठी जयंत धोडपकर, कृषी सहाय्यक कृष्णा कोकाटे व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक पद्धतीने वेळेत उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड, हवामान अंदाज, पीएम किसान योजनेचे अनुदान, उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून प्रत्येक शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी करावयाची आहे. ही नोंदणी केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आयडी मिळणार आहे. कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, यांच्या मार्फत ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करण्यात येणार आहे. सामाईक खातेदार शेतकरी असल्यास प्रत्येक सामाईक खातेदार शेतकऱ्यांची नोंदणी करावी. प्रत्येक गावात होणाऱ्या कॅम्पमध्ये शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आधार, पॅनकार्ड, बॅक खात्याचा तपशील, आधार संलग्न मोबाईल घेवून निशुल्क आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा असे आवाहन तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group