८ दिवसात अस्वली जानोरी पुलाच्या कामाला गती देऊन प्रश्न सोडवू : पुलाखालील बिऱ्हाड आंदोलकांना अधिकाऱ्यांकडून लेखी पत्र : संतोष गुळवे यांच्या नेतृत्वाखाली त्रस्त शेतकऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन मागे

इगतपुरीनामा न्यूज – जानोरी अस्वली रस्त्यावरील ओंड ओहोळ पुलाचे काम एका आठवड्यात तातडीने पूर्ण करून ह्या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू असे आश्वासन इगतपुरीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ च्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात दिले. त्यामुळे ह्या पुलाखाली आज सकाळी सुरु झालेले बिऱ्हाड आंदोलन मागे घेण्यात आले. बेलगाव कुऱ्हेचे माजी सरपंच संतोष सुखदेव गुळवे यांच्या नेतृत्वाखाली हे […]

तुकाराम वारघडे यांच्या आंदोलनाच्या धसक्याने सुस्तावलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग : मुंढेगाव अस्वली स्टेशन रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ इगतपुरी तालुक्यात खराब रस्त्यांमुळे होणारी वाहनधारकाची कसरत कधी थांबेल ? रस्ते दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे करणार आंदोलनास अशा आशयाचे  वृत्त “इगतपुरीनामा”ने प्रसिद्ध केले. ह्या धसक्याने सुस्त सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आहे. मुंढेगाव ते अस्वली स्टेशन रस्त्याचे दुरुस्तीचे काम मार्गी लागल्याने वाहनधारकांनी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांचे आभार मानले […]

इगतपुरीनामा इफेक्ट – अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीची शिक्षण विभागाकडून दखल : दरेवाडीच्या शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरु होणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ इगतपुरी तालुक्यातील भाम धरणग्रस्त काळूस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्याने गटशिक्षणाधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत ही शाळा सुरु करण्याचा आदेश विद्यार्थ्यांच्या हातात सोपवला. पायपीट करीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आंदोलन करू नका यासाठी अक्षरश: काही शिक्षकांनी लोटांगण घातले. मात्र विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का असल्याने […]

“इगतपुरीनामा”च्या बातमीची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दखल : जिल्हा परिषदेकडून ३० लाखांच्या रस्त्यांची होणार चौकशी ; वितरित केलेला निधी खर्च करण्याला मनाई

भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामाइगतपुरीनामा न्यूज, दि. १६ इगतपुरीनामा वेब पोर्टलने आपल्या वेगळ्या शैलीत इगतपुरी तालुक्यातील नागरिकांसह जिल्हाभर भक्कम असं स्थान निर्माण केलं आहे. जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न शासनदरबारी पोहोचून लोकांना न्याय द्यावा अशीच इगतपुरीनामाची भूमिका आहे. त्यानुसार सोमवारी दि. १४ ला इगतपुरीनामा वेब पोर्टलवर “इगतपुरी तालुक्यात डोंगरी निधीचा गैरवापर ? ; २ रस्त्यांना ३० लाखांचा निधी […]

error: Content is protected !!