इगतपुरीनामा इफेक्ट – अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीची शिक्षण विभागाकडून दखल : दरेवाडीच्या शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरु होणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

इगतपुरी तालुक्यातील भाम धरणग्रस्त काळूस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्याने गटशिक्षणाधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत ही शाळा सुरु करण्याचा आदेश विद्यार्थ्यांच्या हातात सोपवला. पायपीट करीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आंदोलन करू नका यासाठी अक्षरश: काही शिक्षकांनी लोटांगण घातले. मात्र विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का असल्याने तो प्रयत्न वाया गेला. अखेर इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी यांनी सहकारी अधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांना पुलावर गाठून चर्चा केली. तातडीने लेखी स्वरूपात शाळा सुरु होणार असल्याची घोषणा केली. यामुळे चिमुरड्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात आनंद व्यक्त केला. शिक्षण विभागाशी संबंधित एका व्यक्तीबाबत ह्या भागातील ग्रामस्थांनी यावेळी “गेला माधव कुणीकडे” अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली. दरम्यान दरेवाडी येथील बंद झालेल्या शाळा प्रकरणी “इगतपुरीनामा” न्यूजकडून सहकार्य मिळाल्याने विद्यार्थी आणि पालक यांनी आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!