तंबाखू मुक्त शाळांचा तालुका म्हणून इगतपुरी तालुका घोषित : गटविकास अधिकाऱ्यांनी केले शिक्षण विभागाचे कौतुक

इगतपुरीनामा न्यूज – सलाम मुंबई फाउंडेशन, एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या मार्फत गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तंबाखू मुक्त शाळांचा इगतपुरी तालुका हा कार्यक्रम इगतपुरी पंचायत समितीमध्ये संपन्न झाला. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी तंबाखू मुक्त शाळांचा इगतपुरी तालुका घोषित करून शिक्षण विभागाचे कार्य कौतुकास्पद आहे असल्याचे सांगितले. प्रास्ताविक तज्ञ मार्गदर्शक संजय येशी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून तंबाखू नियंत्रण कक्षाच्या डॉ. शिल्पा बांगर, सलाम मुंबई फाउंडेशनचे दीपक पाटील, इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी, सर्व शिक्षण विस्ताराधिकारी उपस्थित होते. इगतपुरी तालुका तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाने सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अजय चव्हाण, तज्ञ मार्गदर्शक संजय येशी यांनी तालुकास्तरावर सर्व मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिले. अनेक शाळांनी यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करून इगतपुरी तालुक्यातील सर्वच ३१८ शाळांनी नऊ निकष पूर्ण केल्याने त्या शाळा तंबाखूमुक्त झाल्या. ह्या उपक्रमात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांना सन्मानपूर्वक स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, सर्व विस्ताराधिकारी आणि केंद्रप्रमुख उपस्थित होते. सर्व शाळांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन अजय चव्हाण यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!