स्वराज्यकडून कामगार दिनाच्या निमित्ताने घोटी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र दिनी स्वराज्य संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांच्या संकल्पनेतून घोटी ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक आरोग्य सेवा देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते यांनी स्वराज्यचे आभार मानले. शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार या पंचसूत्रीवर स्वराज्य संघटना काम करीत असून आरोग्य क्षेत्रातही संघटनेचे मोठे योगदान आहे. रुग्णालयात असलेल्या क्षयरोग रुग्णांना सर्वोतोपरी मदत तसेच घोटीत उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा शब्द  स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

स्वराज्य व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नारायण जाधव, उपजिल्हाध्यक्ष डॉ. महेंद्र शिरसाठ, तालुकाध्यक्ष नारायण भोसले, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, माजी सैनिक विजय कातोरे, हरीश चौबे, माजी सैनिक हंबीर, हरीश कुंदे, उपतालुकाध्यक्ष सखाराम गव्हाणे, शेतकरी तालुकाध्यक्ष शिवाजी काजळे, गौतम भोसले, आरोग्य चिटणीस जालिंदर कार्ले, गटप्रमुख बाळु सुरुडे, कैलास गव्हाणे, तालुका संघटक कृष्णा गभाले, गणेश सहाणे, अरुण जुंद्रे, शुभम गभाले, सौरभ गभाले, गणपत शिरसाठ, राजेंद्र भोसले, ईश्वर भोसले, बहीरु भोसले, दीपक खातळे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. वाघ, डॉ. सचिन माकणे, क्षयरोग अधिकारी अजित जाधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश कापसे, डॉ. राहुल वाघ, दीपा गरुड, रुपाली वाघमारे, शीला गावित, रोहिणी पवार, श्रीमती पोटकुले, अजित सारसार, कचरू बोराडे, मंगेश नलावडे, दीपक कटारे, जय तावडे, श्री. भगत आदी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!