“प्रथम”कडून धामडकीवाडी, भावली खुर्द गावांसाठी जीवनदायी कॉन्सन्ट्रेट ऑक्सिजन मशीनचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज – “प्रथम” ही संस्था गाव पातळीवर सामाजिक, शैक्षणिक, कौशल्य प्रशिक्षण व रोजगार, आरोग्य, पर्यावरण अशा वेगवेगळ्या माध्यमांवर काम करते. राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, इगतपुरी ब्लॉक को-ऑर्डिनेटर मनिषा म्हसदे यांच्या माध्यमातून संस्थेने इगतपुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भावली खुर्द व धामडकीवाडीच्या ग्रामस्थांसाठी कॉन्सन्ट्रेट ऑक्सिजन मशीन दिल्या आहेत. कॉन्सन्ट्रेट ऑक्सिजन मशीनमुळे ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीत उपयोग होणार आहे. या करिता ग्रामपंचायत भावली खुर्दच्या ग्रामसेविका रुपाली जाधव यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभले. वाटप कार्यक्रमाप्रसंगी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संस्था नाशिक क्लस्टर हेड दिपाली सातारडेकर, इगतपुरी ब्लॉक को-ऑर्डिनेटर मनिषा म्हसदे,आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, ग्रामसेविका रुपाली जाधव, आरोग्यसेवक बिपीन नेवासकर उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!