इगतपुरीनामा न्यूज – शेतीशाळा कृषी विस्ताराचे सुलभ आणि प्रभावी माध्यम असल्यामुळे तालुका कृषी अधिकारी इगतपुरी रामदास मडके यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यात विविध पिकांच्या शेतीशाळा राबविल्या जात आहेत. त्यानुसार शेणवड बुद्रुक येथे तालुका कृषी विभाग आणि ‘आत्मा’ अंतर्गत टोमॅटो पिकाची शेतीशाळा राबवण्यात येत आहे. यामध्ये टोमॅटो उत्पादक ३० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना दर […]
इगतपुरीनामा न्यूज – ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र म्हणजे वारकऱ्यांचा आत्माच.. हा आत्मा पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेनेच चालतो. वृक्षाचिये पाने हाले त्याचे सत्ते, कोण बोलवितो हरिवीण ह्या अभंगावर अनेकांची श्रद्धा आहे. प्रत्येक माणसामध्येही हाच पंढरीचा पांडुरंग वास्तव्य करतो हा भक्तीभाव मनात ठेवून काम करणारा बोराडे परिवार आहे. पांडुरंगी मन रमवून ह्या पांडुरंगाच्या भक्तीरंगात बोराडे परिवार आपला उद्योग व्यवसाय […]
इगतपुरीनामा न्यूज – २२ ते २४ जानेवारीला इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकांऊटन्टस ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागातर्फे ज्ञानोत्सव विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी परिषदेचे नियोजन गुजरात येथील बडोदा चॅप्टरतर्फे करण्यात आले. या परिषदेत पश्चिम विभागातील गोवा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई व नाशिक चॅप्टर तर्फे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात आरटीईअंतर्गत खाजगी विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार तालुक्यातील सुमारे १६ शाळांमध्ये १५८ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची संधी असून, पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी एका युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यातच आज सकाळी साडेआठच्या दरम्यान दुसरा अपघात घडला आहे. गोंदे फाट्याजवळ महिंद्रा कंपनी परिसरात मोटारसायकलीला एका बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ह्या घटनेत देवळे, ता. इगतपुरी येथील कैलास एकनाथ दालभगत वय २५, कोमल कैलास दालभगत वय २५, साहिल […]
इगतपुरीनामा न्यूज – आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलीला अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना रायगड नगर जवळ वालदेवी पुलाजवळ घडली. ह्या अपघातात देविदास रावसाहेब मुसळे वय २८, रा. नांदूरवैद्य, ता. इगतपुरी हा युवक ठार झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोग आणि ईव्हीएमविरोधातील लढा सुरूच ठेवला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदिवासी सेलचे नेते लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज इगतपुरी तहसीलदार कार्यालयात निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणुक आयोगाच्या मदतीने घोटाळा केला. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे […]
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलनाचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशभक्ती गीतांवर नृत्य, बेटी बचाओ बेटी पढाओसह उपक्रमांनी प्रेक्षकांना भावूक केले. विद्यार्थ्यांनी विविध विषयावर कार्यक्रम सादर केले. यावेळी केंद्रप्रमुख संजय बोरसे, उपसरपंच शहनाज शेख, फिरोज शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अमजद पटेल, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बबलू उबाळे, शाळा व्यवस्थापन समिती […]
इगतपुरीनामा न्यूज – ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त टिटोली येथे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती सदस्या अनिता हाडप यांनी, ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपसरपंच माया भडांगे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करून शाळेची यशोगाथा मांडण्यात आली. टिटोली ग्रामपंचायत व ड्यु ड्रॉप्स रिसॉर्ट यांचे उपक्रमांसाठी सहाय्य लाभले. मागासवर्गीय […]
इगतपुरीनामा न्यूज – श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरी येथे आज मोठ्या उत्साहात ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. व्यवस्थापकीय संचालक सुहास राजमाने यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सूतगिरणीचे संस्थापक हातकणंगलेचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेश सर्वांना वाचून दाखवण्यात आला. येत्या मार्चमध्ये मोठ्या दिमाखात श्री स्वामी […]