
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्धीतील गौळाणे येथे अवैध गावठी दारू हातभट्टीच्या २ धंद्यावर पोलीस अधीक्षक नाशिक यांच्या विशेष शाखा पथकाच्या पोलिसांनी वेगवेगळे छापे टाकले. पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराच्या मार्फत पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. पहिल्या घाटंबेत संशयित आरोपी द्वारकाधीश राजाराम तपासे हा गावठी दारूची विक्री करतांना सापडला. ७ हजार ४०० रुपयांची हातभट्टीची दारू त्याच्याकडे सापडली. दुसऱ्या घटनेत संशयित आरोपी शंकर दिलीप पवार हा देशी व गावठी दारूची विक्री करतांना सापडला. त्याच्याकडे ७ हजार ६५० रुपयांचा मुद्धेमाल सापडला. त्यानुसार विशेष पथकाचे पोलीस सागर प्रकाश सौदागर यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात वेगवेगळी फिर्याद दिली आहे. मुंबई दारूबंदी कायदा ६५ ख, ड आणि ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी द्वारकाधीश राजाराम तपासे, शंकर दिलीप पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोलीस हवालदार सागर सौदागर, दत्तू पवार, सुजित इंगळे, उर्मिला पारवे, हेमंत वाघ यांनी ही कामगिरी केली.