इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
भगूर येथील नूतन विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी कु. ओवी अमोल वालझाडे हिने नुकतेच प्रवेश परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. तिची पुढील शिक्षणासाठी नवोदय विद्यालयात निवड झाल्याने तिचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. इगतपुरी तालुक्यातील मेंगाळवाडी येथील शिक्षक अमोल वालझाडे आणि निनावी येथील उपक्रमशील शिक्षिका सुशीला वालझाडे यांची ती मुलगी आहे. कु. ओवीला त्यांनी नियमितपणे सखोल मार्गदर्शन केले. यामुळे नाशिक येथील केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयात तिची पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल भगूरच्या शिक्षण मंडळाने पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा दिल्या आहेत.