कुर्णोली आदिवासी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण नाडेकर, व्हॉइस चेअरमनपदी ॲड. भारत कोकणे बिनविरोध : शिवराम झोले, निवृत्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

कुर्णोली आदिवासी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण नाडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. व्हॉइस चेअरमनपदी ॲड. भारत कोकणे यांचीही बिनविरोध वर्णी लागली आहे. इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आणि संचालकांचे इगतपुरी तालुक्यातून अभिनंदन सुरु आहे. यावेळी कुर्णोली सोसायटीचे सर्व संचालक मंडळ आणि समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आमचा्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून सोसायटीच्या माध्यमातून चांगले काम उभे करू असा शब्द नूतन पदाधिकाऱ्यानीं यावेळी दिला.

Leave a Reply

error: Content is protected !!