
इगतपुरीनामा न्यूज, दि. २
इगतपुरी तालुक्यातील वाकी बिटूर्ली ग्रामपंचायतीच्या वतीने दिननिमित्त वृक्षारोपण आणि वृक्षाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्राला सुफलाम करून हरितक्रांतीने महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्च करणारे वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्मदिन कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.
पर्यावरणाचे संरक्षण करून वसुंधरेला जगवण्यासाठी
वृक्षारोपण व झाडांचे वाटप करण्यात आले अशी माहिती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी सरपंच संदिप काशिनाथ कुंदे, उपसरपंच अनिता शिवनाथ काळे, ग्रामसेविका ज्योतीप्रकाश केदारे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पंढरीनाथ कडाळी, मिना सोमनाथ कडाळी, मयूर दौलत डोळस, अनिल मधुकर डहाळे यांच्यासह देवराम मराडे, शिवनाथ काळे, खंडूसिंग परदेशी, सपन परदेशी, संदिप पारधी, शिक्षक रवींद्र पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. आगामी काळात लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांकडून सहभाग मिळणार आहे.
