स्वराज्य पक्षाकडून महामार्ग, जुनवणेवाडी आणि विविध भागात रस्त्यासाठी आंदोलन : जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य प्रमुख संभाजी राजे छत्रपती, संपर्कप्रमुख करण गायकर, सरचिटणीस धनंजय जाधव आणि नाशिक जिल्ह्यात जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांचा मार्गदर्शनाखाली विविध भागात रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आले. जुनवणेवाडी येथे रस्ता नसल्याने मयत झालेल्या दुर्दैवी भगिनीला स्वराज्य पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.  यावेळी पदाधिकाऱ्यांनी पिडीत कुटुंबाची विचारपूस आणि चौकशी केली. महिलेवर वैदूकडून औषधोपचार करण्यात आल्याचा प्रशासनाचा आरोप संबंधित कुटुंबाने फेटाळून लावला. ह्या पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ह्या वाडीत तातडीने रस्ता व्हावा यासाठी रस्त्याची आग्रही मागणी करण्यात आली. स्थानिक आमदार व खासदारांनी जनतेला वेठीस न धरता त्वरित लक्ष घालून न्याय द्यावा अन्यथा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुनवणे वाडीच्या रस्त्याबाबत आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. रस्त्याच्या प्रश्नावर इगतपुरी तालुक्यातील महामार्ग आणि विविध गावांमध्येही स्वराज्य पक्षाने आंदोलन केले. चांगले रस्ते आमच्या हक्काचे आहेत. गाडी घेताना रोड टॅक्स आणि रस्त्यावर टोल भरुन देखील रस्त्यांची भयानक अवस्था आहे. ह्या परिस्थितीत लोकांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी स्वराज्य ह्या एकमेव पर्यायाला पहिली पसंती द्यायला हवी असे मनोगत जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांनी व्यक्त केले.

रस्ते आमचा हक्काचे नाही कोणाच्या बापाचे.. अशा घोषणा देऊन स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर आंदोलन केले.  यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांचा सत्कार करुन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रशासनाने आंदोलनाची लगेचचं दखल घेऊन काही तासातच खड्डे भरायला सुरवात केली. याबद्दल जिल्हाप्रमुख डॉ.  रुपेश नाठे आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले. आंदोलनावेळी स्वराज्य जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, उपजिल्हाप्रमुख महेंद्र शिरसाठ, तालुकाप्रमुख नारायण भोसले, जुनवणेवाडी येथील पिडीत कुटुंब, तालुका संपर्कप्रमुख शिवाजी गायकर, तालुका उपप्रमुख सखाराम गव्हाणे, व्यापारी आघाडी नारायण जाधव, सहकार आघाडी हरिष कुंदे, युवा आघाडी गोकुळ धोंगडे, युवा संपर्कप्रमुख विवेक वारुंगसे, संघटक कृष्णा गभाले, रोहिदास टिळे, गणेश सहाणे, वैभव दातीर, अनिल शेजवळ, ज्ञानेश्वर मालुंजकर, राहुल भोर, यश ठोके, बंटी टिळे, अंकुश शेजवळ , विशाल पवार, अजय कश्यप, बनु सहाणे, उमेश सुरुडे, मारुती आघाण, जुनवणेवाडी ग्रामस्थ आणि इगतपुरी तालुक्याच्या विविध भागातील नागरिक हजर होते.

Similar Posts

error: Content is protected !!