पाडळी फाट्यावरील अपघातात ३ जण गंभीर जखमी : अपघातांचे सत्र पुन्हा वाढल्याने चिंता वाढली

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

अपघातांची संख्या पुन्हा वाढत असून महामार्ग प्राधिकरण विभागाकडून कोणकोणत्या उपाययोजना सुरु आहेत याबाबत काही आकलन होत नाही. आज दुपारी नासिककडून घोटीच्या दिशेने जाणारी भरधाव वॅगनर पलटी होऊन झालेल्या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर पाडळी फाट्याजवळ आज दुपारी पावणेबारा वाजता हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन ३ जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. उमेश आर. भट्टड वय ४६, उल्हास एन. पारखी वय 50, अनिल विठ्ठल लोखंडे वय 45 सर्व राहणार नाशिक अशी गंभीर जखमींची नावे आहेत. MH 15 BN 5842 असा अपघातग्रस्त वॅगनरचा क्रमांक आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!