
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख जवळ मेंढ्या चारणाऱ्या कळपातील एका व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. स्थानिकांच्या मदतीने कुटुंबियांनी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले मात्र ही रुग्णवाहीका आली नाही. स्थानिक कारखान्यातील रुग्णवाहिकेने सुद्धा अत्यवस्थ व्यक्तीला नेण्यासाठी असमर्थता दाखवली. मात्र जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ हजर होऊन ह्या रुग्णाला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यामुळे त्याचा प्राण वाचला आहे. अनेक संकटे सुरु असतांना देवासारखे धावून प्राण वाचवणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. बाळू दामू कोळपे वय ३५ रा. ढवळपुरी ता. पारनेर जि. अहमदनगर असे विष प्राशन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.