इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील गिऱ्हेवाडी येथील एका घरामध्ये बिबट्या शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. बिबट्या घरामध्ये शिरला त्यावेळेला कुटुंबातील पाच सहा जण घरामध्ये होते. बिबट्याला पाहून घरातील सदस्यांनी घराच्या बाहेर पळ काढला. तातडीने दरवाजा लावून घेतल्याने बिबट्याला घरामध्ये बंदिस्त करण्यात यश आले आहे. इगतपुरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. टोंकीलायझेशनची टीम देखील घटनास्थळावर दाखल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यामध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर बघायला मिळत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. दुसऱ्या एका घटनेत दौंडत येथील एका गोठ्यात वासरावर हल्ला करण्याच्या तयारीत बिबट्या शिरला. मात्र गायीने जोरदार हंबरडा फोडल्याने बिबट्याने धूम ठोकली. दरम्यान घरात घुसलेल्या ८ वर्षाच्या नर बिबट्याला दोरीच्या साहाय्याने फास अटकवून रेस्क्यू करण्यात आला. रेस्क्युची कार्यवाही जवळपास ३ तास चालली. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखाली 3 तास परिश्रम घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वनविभागाने रेस्क्यु यशस्वी केला.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group