इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील घाटघर येथील तरूणी इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर येथे लग्नासाठी घाटघर येथुन वऱ्हाडाबरोबर आली होती. मात्र लग्न लागण्याच्या सुमारास अचानक तरुणी गायब झाल्याने एकच खळबळ उडालीआहे. याबाबत तरुणीच्या वडीलांनी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घाटघर येथील राजु चिमा सुरनर यांची मुलगी संजना राजु सुरनर, वय १८ वर्ष, वाळविहीर येथील नातेवाईकांच्या लग्नाला २१ मे रोजी वऱ्हाडाच्या गाडीत मैत्रिणी बरोबर आली होती. मात्र लग्न संपल्यावर संजना सुरनर अचानक गायब झाली असल्याची बाब समोर आल्याने संजनाचे वडील यांनी संजनाचा वेळोवेळी शोध घेतला. मात्र संजना मिळुन न आल्याने अखेर राजु सुरनर यांनी २४ मे रोजी घोटी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती.
राजु सुरनर यांनी याबाबत नाशिक ग्रामिण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्याकडे तक्रार दिली. या तक्रारीत म्हटले आहे की, माझी मुलगी ज्या मैत्रिणी सोबत लग्नाला गेली त्या मैत्रिणीच्या ओळखीचे इसम मोहित सिताराम हुलगुंडे, कुशी गणपत गुडनर, पिंटी गणपत गुडनर रा. नांदगाव, तालुका जव्हार यांनी माझ्या मुलीला लग्नाच्या वऱ्हाडामधुन फसवुन नेलेले आहे. सदर मोहित हुलगंडे व इतरांची चौकशी करून माझी मुलगी संजना सुरनर हिचा शोध घेऊन सदर इसमांवर योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार राजु सुरनर यांनी केली आहे.