भाचीचे लग्न पार पाडणारे मामा भरविर फाट्यावरील अपघातात जागीच ठार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

शुक्रवारी सायंकाळी भाचीचे लग्न आटोपून घरी परतत असताना सिन्नर घोटी महामार्गावरील भरविर फाटा येथे रात्री साडेअकरा वाजता जोरदार अपघात झाला. समोरून येणारा मालवाहतूक ट्रक MH 20 CT 1196 या गाडीने जोराची धडक दिल्याने दुसऱ्या वाहनाला भयानक धडक झाली. यामध्ये भाऊसाहेब शांताराम टोचे वय ४० रा.  निनावी ता. इगतपुरी हे अपघात जागीच ठार झाले.

त्यांच्या अपघाती निधनाचा परिसरात शोक व्यक्त होत आहे.  यामुळे ७० वर्षीय आई, 33 वर्षीय पत्नी आणि १ वर्षाची मुलगी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्व कुटूंबाची जबाबदारी निभावत असताना असे अचानक जाणे या कुटूंबाला खूप मोठे दुःखदायक आहे. मुलांचे शिक्षण आई व पत्नीची जबाबदारी अर्ध्यावर सोडून ट्रक चालकाच्या चुकीच्या ड्रायव्हिंगमुळे हे कुटूंब उघड्यावर पडल्याने इगतपुरी तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!