
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील निनावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कुलमध्ये इयत्ता पहिलीच्या डिजिटल वर्गखोलीचे उदघाटन संपन्न झाले. केंद्रप्रमुख अनिल पगार, सरपंच गणेश टोचे यांच्या हस्ते नुकतेच डिजिटल वर्गखोली कार्यान्वित करण्यात आली. इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी किशोर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सुशीला चोथवे यांच्या प्रयत्नातून इयत्ता पहिलीचा डिजिटल वर्ग मिळाला आहे. याबाबत येथील पालकांनी आभार मानले. या वर्गासाठी माजी सैनिक हरिष चौबे यांनी सामाजिक बांधीलकीमधून आर्थिक सहाय्य केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्धल केंद्रप्रमुख अनिल पगार यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका शारदादेवी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी भोर, उपाध्यक्ष शैला भगत, सागर टोचे, गोकुळ गायकवाड, अशोक भोर, भीमराव गायकवाड, राहुल ढोन्नर, श्री गोसावी, रामनाथ टोचे, रामदास कवटे, माया सोनवणे, राजेमारुती कुंदे, बाळासाहेब टोचे, संगीता शिंदे, रंजना कुंदे, मनीषा फोडसे, चंद्रभागा गरुड, श्रीराम सूर्यवंशी, राधा कोंडूळे, राजेंद्र महात्मे, शंकर खैरनार, स्वाती खालकर, संगीता केदारे, समाधान केदारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.