नवीन कसारा घाटात कंटेनरचा अपघात : २ जण गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

मुंबई आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाट उतरत असताना कंटेनर क्रमांक MH 04 JK 0315 च्या चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. यामध्ये कंटेनर लतिफवाडीच्या वळणावर पलटी झाला. यात क्लीनर हा बाहेर फेकला जाऊन जखमी झाला. चालक हा कंटेनरमध्ये अडकल्याने त्यास एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमने बाहेर काढले. महामार्ग पोलीस केंद्रांच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन क्रेन व जेसीबीच्या साहाय्याने जखमींम बाहेर काढण्यात आले. चालकाचा एक पाय फॅक्चर होऊन गंभीर जखमी झाला आहे. जखमींना जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविंदर सिंग वय  37 रा. गोरखपुर, अमितकुमार शुक्ला वय 27 रा. बुधाकला उत्तर प्रदेश अशी जखमींची नावे आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!