२ अपघात – भावली धरणाजवळ वाहनांच्या धडकेत ८ जण जखमी : दुसऱ्या अपघातात आठव्या मैलावर बहिणभाऊ गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या पुढे महिंद्रा हरियाली प्रोजेक्टजवळ आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन वाहनात जोरात धडक झाल्याने अपघात झाला. व्हॅगनर कार क्रमांक MH 04 GU 7748 ही पिंप्री सदोच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या महिंद्रा मॅक्स क्रमांक MH 18 W 6563 या दोन वाहनात समोरासमोर जोरदार धडक झाली. ह्या अपघातात 2 जण गंभीर तर 6 जण जखमी झाले आहेत. ह्या घटनेची माहिती मिळताच इगतपुरी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, एनएचएआय रुग्णवाहिकेद्वारे सर्व जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुसरा अपघात महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे जात असताना निर्मल आश्रमाजवळ आठवा मैल भागात सायंकाळी साडेसहाच्या वेळेला झाला. MH 15 GY 3643 ह्या मोटारसायकलला मागून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये अशोक मधुकर गवई वय 44 रा. सिडको नासिक, अलका नरेंद्र जाधव वय 38 रा. गौळाणे हे बहिणभाऊ गंभीर जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!