मोबाईल आणि सायकलच्या दुकानाला लागली आग ; घोटी शहरातील घटना

इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथील जनता विद्यालयाजवळ असलेल्या सायकल व मोबाईलच्या दुकानाला आग लागली आहे. आधी सायकलच्या दुकानाने पेट घेतल्यानंतर मोबाईलचे दुकानही आगीच्या विळख्यात सापडले आहे. ह्या आगी घटनेत दोन्ही दुकानातील साहित्य जळुन भस्मसात झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घोटी पोलिस, इगतपुरी अग्निशमन दल, महिंद्रा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. 

Similar Posts

error: Content is protected !!