इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते शरद जोशी यांची घोटी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने आज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. किसान महानायक शरद जोशी यांनी यात्री सूत्राचा संबंध शेती शोषणात कसा दडलेला आहे हे आंदोलनाच्या अभिनव क्रियाशीलतेतून सिद्ध करून दाखवले. भारतीय अर्थव्यवस्था शेतीप्रधान असली पाहिजे हे त्यांनी स्वतः प्रयोग करून सिध्द केले. शेती विरुद्ध धोरण, शेती विरोधी कायदे, शेती विरोधाभासी स्थिती त्या पुराव्यानिशी शेतकऱ्यांसमोर मांडल्या. स्वतंत्र भारत आंदोलनावर शेती कारणाचा प्रचंड प्रभाव होता. शरद जोशीनी आंदोलनाला महात्मा गांधींचे रुपक दिले अशी भावना इगतपुरी तालुक्यातील पदाधिकारी याच्या मनातून व्यक्त झाली. यावेळी हे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे व्रत सर्वानी जाहीर केले. शरद जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्त उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखबाळासाहेब धुमाळ, उपजिल्हाध्यक्ष तानाजी झाडे, तालुकाध्यक्ष किसन शिंदे, तालुका उपाध्यक्ष अरुण जुंद्रे, तालुका सचिव रामदास गायकर, आदिवासी जिल्हा सेलचे अध्यक्ष पांडुरंग शेंडे, आदिवासी तालुका सेलचे अध्यक्ष डॉ. संजय बांबळे, घोटी शहराध्यक्ष डॉ. युनुस रंगरेज, बाळासाहेब नाठे, रामनाथ जाधव, संघटक भाऊसाहेब गायकर, काळू सोनवणे, वसंत चव्हाण, गोविंद मडके, कैलास ताठे, सोनु आडोळे, हरिचंद्र वाघ, विशाल उगले आदी यावेळी उपस्थित होते.