बालभैरवनाथ फाऊंडेशनकडून २ मुलींना मिळाले शिक्षणाचे सहाय्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथे गेल्या ७ वर्षांपासून बालभैरवनाथ फाऊंडेशन ही शासनमान्य नोंदणीकृत  संस्था सामाजिक व शैक्षणिक काम करत आहे. सामाजिक कामासोबतच गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. गावातील कु. मनिषा पांडूरंग मुकणे, कु.सोनाली नंदू बांडे या अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील हुशार व होतकरु विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थींनींचा १२ वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च फाऊंडेशनने उचलला होता. त्या दोघीही यावर्षी १२ वी विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण नर्सिंगमधून करण्याचा मनोदय फाउंडेशनचे अध्यक्ष तुकाराम सारुक्ते यांच्याकडे व्यक्त केला होता. त्यांनी या विषयाला बालभैरवनाथ फाऊंडेशनच्या संचालक मंडळाची मान्यता घेऊन ह्या मुलींचा प्रवेश नायकवडी वैद्यकीय सेवा संस्था संचलित राजीव गांधी मेमोरियल नर्सिंग काॅलेज सिन्नर येथे घेतला. या दोघीही मुली बालभैरवनाथ फाऊंडेशनच्या आर्थिक पाठबळावर या नर्सिंग काॅलेजमध्ये GNM प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. बालभैरवनाथ फाऊंडेशनच्या या कामाचे परिसरातून कौतुक होत आहे.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स
इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!