
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील पेन्शनर्स असोसिएशनचा तालुका मेळावा घोटी शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शेकडो सेवानिवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी उपस्थित होते. सुरवातीला जिल्हा कार्यकारिणी व विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त शिक्षकांची प्रलंबित फरक बिले, महागाई भत्ते, निवडश्रेणी प्रकरणे, उपादान, अंशराशिकरण बिले इत्यादी महत्वाच्या विषयावर अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले. उपस्थितांच्या प्रश्नांना जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष बाळासाहेब खैरनार, यशवंतराव गायकवाड, धनराज वाणी, रामदास सोनवणे, दत्तात्रय वाणी यांनी समर्पक उत्तरे दिली. त्यानंतर पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्याचा निर्णय सभासदांनी घेऊन सर्वानुमते बिनविरोध अध्यक्ष म्हणून दत्तात्रय लक्ष्मण वाणी, सरचिटणीस म्हणून भिला तात्या अहिरे यांची निवड एकमताने करण्यात आली. मेळाव्यासाठी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खैरनार, सचिव धनराज वाणी, जिल्हा पदाधिकारी यशवंतराव गायकवाड, रामदास सोनवणे, गावंडे गुरुजी, विस्ताराधिकारी एन. डी. मोरे, केंद्रप्रमुख पंडितराव धोंडगे, श्रीराम आहेर, अशोक कुमावत, श्री.पगार, रमेश तुपे, पुंजाराम हिरे, हरिभाऊ जाधव, श्री.हेमके सर, मुठे सर, बेंडकोळी सर, शिरसाठ बाबा, लोहकरे सर, बापुसाहेब देवरे, ठोकळ गुरुजी, लहानु लोटे, निकुंभ, श्रीमती ठाकूर, खतेले, खेताडे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी श्री. वाणी व अहिरे यांचे अभिनंदन केले.