इगतपुरीनामा न्यूज, दि.२४
इगतपुरी तालुका साहित्य मंडळातर्फे दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी ‘सर्वतीर्थ’ पुरस्कार जेष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांना देण्यात येणार आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार इंजि. भाऊसाहेब खातळे, ‘ज्ञानसाधना’ पुरस्कार शिक्षक अनिल शिरसाठ, ‘ज्ञानदुत’ पुरस्कार प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, ‘काव्यरत्न’ पुरस्कार कमलाकर ( आबा ) देसले, ‘अक्षरदूत’ पुरस्कार पत्रकार रमेश पडवळ, ‘कलारत्न’ पुरस्कार कृष्णा बेलगावकर,’सामाजिक कृतज्ञता’ पुरस्कार यमुताई अवकाळे यांना देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली.
ॲडया पुरस्कारांचे वितरण २६ व २७ नोव्हेंबरला कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालय इगतपुरी येथे होणाऱ्या २२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. संमेलनाला सर्व पुरस्कारार्थी, साहित्यिक, पत्रकार, लेखक आणि कवीनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने, ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, दत्तात्रय झनकर, रवींद्र पाटील, डॉ. पी. आर. भाबड, हिरामण शिंदे, प्रा. देविदास गिरी, मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे यांनी केले आहे.