प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समितीवर गोपाळा लहांगे यांची नियुक्ती : राज्यपालांच्या आदेशानुसार शासन निर्णयाद्वारे झाली निवड

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी योजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समित्यांची स्थापना झालेली आहे. या समितीवर राज्यपालांच्या आदेशानुसार निवड इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळा लहांगे यांची नियुक्ती झाली आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व कॉंग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांचे ते निकटचे समर्थक असून त्यांची नियुक्ती राज्यपालांच्या आदेशानुसार निवड झाल्याचे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांनी कळवले आहे.

शासन निर्णयानुसार राज्यातील आदिवासी प्रकल्प क्षेत्रातील १९ प्रकल्पस्तरीय ( नियोजन आढावा ) समित्यांची नियुक्ती करून त्यावर अध्यक्ष व अशासकीय सदस्य निवड करण्यात आली आहे. त्यात इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती तथा आमदार हिरामण खोसकर व कॉंग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांचे निकटचे समर्थक गोपाळा लहांगे यांची नियुक्ती झाली आहे. माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या कार्यकाळातही जिल्हा नियोजन समितीवर गोपाळा लहांगे यांनी यशस्वी कामकाज केले आहे. इगतपुरी तालुक्यात औद्योगिक वसाहतीमुळे सर्वात सधन व संपन्न समजल्या जाणाऱ्या वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीवर अनेकदा सरपंचपद व त्यानंतर इगतपुरी पंचायत समितीचे सभापतीपदही त्यांनी भोगलेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती संपत काळे, कचरू शिंदे, पांडुरंग शिंदे, रामदास बाबा मालुंजकर, कारभारी नाठे, पाडळी देशमुखचे माजी सरपंच जयराम धांडे, सुदाम भोर, अरुण गायकर, संपतराव मुसळे, बाळासाहेब कुकडे, देवराम मराडे आदींसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.  इगतपुरी तालुक्याच्या सर्व स्तरातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!