धामणी येथे राजे भोसले क्रिकेट क्लब, छत्रपती बॉईज ११ तर्फे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा

इगतपुरीनामा न्यूज – धामणी येथे २७ एप्रिलपासून सरपंच चषक, राजे भोसले क्रिकेट क्लब धामणी, छत्रपती बॉईज ११ पिंपळगाव मोर आयोजित ओव्हरम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक गणेश भोसले, समाधान काळे, सौरभ बेंडकोळी, वैभव कुंदे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भोसले, कल्पेश काळे, सोमनाथ येडे, दीपक भोसले, संदीप भोसले, सुनील मेंगाळ, प्रेम माळी, प्रकाश गांगड आदींनी केले आहे. सामन्याचे ठिकाण धामणी फाटा ( मडके माळा ) येथे आहे. या स्पर्धेचे पहिले वर्षे असून ज्यांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांच्यासाठी ३००० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.

माजी उपसरपंच गौतम भोसले, स्वराज्यचे तालुकाध्यक्ष नारायण राजेभोसले, सामाजिक कार्यकर्ते विनायक लाड यांच्याकडून प्रथम ३१ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. द्वितीय बक्षीस गणेश टोचे २१०००, तृतीय १५००० दारणामाई अर्थमूव्हर्सचे दीपक भोसले, चवथे पारितोषिक ११००० किरण भोसले यांच्याकडून, पाचवे बक्षीस ७००० सुदाम भोसले, सहावे बक्षीस ६००० शरद कदम, पिंपळगाव मोर, सातवे पारितोषिक ५००० संदीप भोसले, आठवे पारितोषिक भाऊसाहेब भोसले ५००० असे ठेवण्यात आले आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी युनियन बँकेचे व्यवस्थापक प्रवीण पगारे, मॅन ऑफ द मॅच फायनल गोकुळ सुरुडे, उत्कृष्ट गोलंदाज रघुनाथ गोडे, परी कलेक्शन यांचे सहाय्य आहे. सर्व सामने एक गाव एक संघ पद्धतीने खेळले जातील..पहिले चार पोल मर्यादित ठाकूर खेळवले जातील. पंचांचा निर्णय अंतिम राहील, प्रत्येक सामना चार पाच शतकांचा खेळवला जाईल, संघ वेळेवर हजर नसल्यास ३ बॉल पेनल्टी राहील, बुकिंग करणाऱ्या संघाला प्रवेश दिला जाईल, काही नियम व अटी कमिटीकडे राहतील, आधारकार्ड अनिवार्य राहील, असे स्पर्धेचे नियम व अटी आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!