
इगतपुरीनामा न्यूज – केंद्र पुरस्कृत पोषण अभियानांतर्गत “राष्ट्रीय पोषण महिना” राज्यस्तरीय उदघाटन सोहळा इगतपुरी तालुक्यातील घोटी येथून करण्यात येणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. कु. अदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्या १ सप्टेंबरला सकाळी मातोश्री लॉन्स घोटी येथे उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. ह्या कार्यक्रमाला इगतपुरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिला व बालविकास मंत्री ना. कु. अदिती तटकरे यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी केले आहे. ना. तटकरे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वपूर्ण नेत्या असून इगतपुरी तालुक्यातील दौऱ्यावेळी तालुक्यातील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यांचे जंगी स्वागत झाल्यानंतर राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्याशी थोडक्यात चर्चा करणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असेही गोरख बोडके यांनी कळवले आहे.