अपघातांची मालिका सुरूच ; इंदोरे येथील ४ जण माणिकखांबजवळ जखमी : अपघात रोखवा, अन्यथा आंदोलन – हरिश्चंद्र चव्हाण

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

इगतपुरी तालुक्यात अपघातांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असूनही तसे झाले नसल्याने अपघातांची संख्या वाढतच आहे. आज दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमाराला माणिकखांब गावाजवळ मोटारसायकलला अज्ञात भरधाव वाहनाने कट मारल्याने अपघात झाला. यामध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि १ बालिका असे ४ जण जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व अपघातग्रस्त इगतपुरी तालुक्यातील इंदोरे येथील आहेत.

MH 15 EM 5402 ह्या मोटारसायकलवरून रोहिदास हरिभाऊ भांगरे वय 30, शांताबाई शंकर शेणे वय 60, सुनिता कैलास साबळे वय 30, जान्हवी कैलास साबळे वय ७ वर्ष सर्व राहणार इंदोरे ता. इगतपुरी हे घोटीकडून नाशिकच्या दिशेने जात होते. दुपारी सव्वाबारा वाजता माणिकखांब गावाजवळ अज्ञात वाहनाने कट मारला. यामुळे झालेल्या अपघातात ते जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेच्या तत्परतेमुळे सर्वांचा जीव बचावला. कालच माणिकखांब येथील एका युवकाला अपघातात प्राण गमावले लागले. याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!