इगतपुरी प्रादेशिक वनपरिक्षेत्रातर्फे इगतपुरी तालुक्यात जागतिक व्याघ्रदिन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी प्रादेशिक वनपरिक्षेत्रातर्फे उपवसंरक्षक पंकज कुमार गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यातील विविध ठिकाणी जागतिक व्याघ्रदिन साजरा करण्यात आला. कुशेगाव येथे वनपरिमंडळ अधिकारी सुरेश चौधरी, वनरक्षक कावेरी पाटील, कुशेगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या पुढाकाराने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त कुशेगांव शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी वाघ/ बिबट या वन्य प्राण्यांविषयी विषयी जनजागृती करून उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी गावातील विविध पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला आणि वन कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

Similar Posts

error: Content is protected !!