
इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
सध्या राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत असल्याचे वातावरण आज आहे. आज दुपारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सद्रोद्दीन, भावली धरण परिसर, धामडकीवाडी, जामुंडे, गव्हांडे आदी गावांसह अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपिट झाली. दुपारी एक ते दीड तास विजेच्या कडकडाटासह गारपिटीमुळे अवकाळी पाऊस कोसळला. इगतपुरी तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून गारपीट एवढी तीव्र झाली की भावली, पिंप्री, धामडकीवाडी हे गाव आहे की जम्मू कश्मीर असे वाटू लागले आहे. कारण, संपूर्ण गावात बर्फाची पांढरी चादर पसरल्याचे पाहायला मिळाले. या गारपीटीमुळे या परिसरात गारवा निर्माण झाला आहे