इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान महिन्यात उपवास असतात. उपवास सोडण्यासाठी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान फळांचा आस्वाद घेतला जातो. त्यानुसार रमजानच्या पार्श्वभूमीवर फळांच्या आस्वादाचे आयोजन करण्यात आले. पिंप्री सद्रोद्दीन येथे पीके ग्रुप आणि डीडी ग्रुपतर्फे ही इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डीडी ग्रुपचे ज्ञानेश्वर लहाने, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, काँग्रेस नेते संदीप गुळवे, सभापती विठ्ठल लंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, पीके ग्रुपचे प्रशांत कडू, नंदलाल भागडे, धनंजय पोरजे, जगन कदम, पोपट भागडे, योगेश भागडे आदी उपस्थित होते. सुन्नी मुस्लिम जमातच्या वतीने फिरोज शेख, मतीन पठाण, अमजद पटेल, आसिफ पटेल, आयाज पठाण, ताहीर पटेल, बबलू उबाळे, प्रकाश उबाळे, बाळा कदम, संतोष कदम व ग्रामस्थ सर्वांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले. सुन्नी मुस्लिम नवजवान कमिटीच्या वतीने पीके ग्रुप, डीडी ग्रुप यांचे आभार मानण्यात आले.