भरवीर बुद्रुकला रविवारी शहीद अण्णासाहेब झनकर स्मारक लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज – भरवीर बुद्रुक येथे उद्या रविवारी सकाळी १० ला शहीद अण्णासाहेब तुकाराम झनकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी सैनिक संघटना इगतपुरीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. १५ जून २००३ ला जम्मू काश्मीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना पॅरा कमांडो मराठा युनिटचे अण्णासाहेब झनकर यांना 18 गोळ्या लागून वीरमरण आले. या शहीद जवानाच्या आठवणी आणि कार्याला उजाळा मिळण्यासाठी शहीद अण्णासाहेब झनकर स्मारकाचे काम भारतीय माजी सैनिक संघटना,इगतपुरी यांच्या प्रयत्नांनी पूर्ण झाले आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांची सर्वांना आठवण रहावी म्हणून भारतीय माजी सैनिक संघटना इगतपुरी याच्या प्रयत्नातून लोकनेते, लोकप्रतिनिधी, शासकीय, प्रशासकीय, व्यापारी क्षेत्रातील प्रतिनिधी, आजी- माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, वीर पिता, नागरिकांच्या सहकार्याने शहीद स्मारक उभारले आहे. भरवीर बुद्रुकच्या ( काराचा मळा ) याठिकाणी लोकार्पण सोहळा होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय माजी सैनिक संघटना,इगतपुरी व ग्रामपंचायत भरविर बुद्रुकच्या वतीने करण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!