अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने 24 एप्रिलपासून नाशिक जिल्हा दौरा : पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाभर होणार आढावा बैठका

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीत नुकतेच फेरबदल करण्यात आले असून जिल्हाभरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आढावा बैठका घेण्यात येत आहे. 24 एप्रिलपासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे, नाशिक शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, डॉ. मोहन शेलार, शिवा काळे यांच्याकडून नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी आढावा बैठका घेण्यात येणार आहे.

24 एप्रिलला सकाळी 9 वाजता सिन्नर तालुका तर 11 वाजता इगतपुरी तालुक्यात बैठक होईल. 4 मे रोजी सकाळी 11 वाजता मालेगाव तालुका व दुपारी 3 वाजता नांदगाव तालुक्यात ह्या बैठका होणार आहेत. या बैठकीस जास्तीत जास्त समता सैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे, नाशिक शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, डॉ. मोहन शेलार, शिवा काळे यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!