इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात आज सकाळी ७ वाजता ट्रक पलटी होऊन अपघात झाला. मक्याने भरलेला ट्रक क्रमांक MH 15 EG 6726 हा पलटी होऊन 30 फूट दरीत कोसळला आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना ब्रेक फेल पॉइंटजवळ हा अपघात झाला. या अपघातात ट्रकचा चालक जागीच ठार झाला असून एक जण गंभीर झाला आहे. अपघाताचे वृत्त समजताच रूट पेट्रोलिंग टीम, वाहतूक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. ठार झालेल्या व्यक्तीसह जखमीला बाहेर काढण्यासाठी उपाययोजना आणि प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. ट्रक चालकाचा मृतदेह खाली दबल्याने बाहेर काढण्यात अडचण येत असल्याचे समजते. अपघातग्रस्त ट्रकला दरीतून क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रूट पेट्रोलिंग टीमचे राहुल पुरोहित, ज्ञानेश्वर पासलकर, सुरज आव्हाड, आपत्ती व्यवस्थापन टीमचे देवा वाघ, दत्ता वाताडे, बाळू मांगे यांच्यासह कसारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी चौधरी सर, महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी मदतकार्य करीत आहेत.