पिंप्री सद्रोद्दिन ग्रामपंचायतीतर्फे डिजिटल शाळांसाठी ४ स्मार्ट टीव्ही संचाचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

पिंप्री सद्रोद्दिन येथील जिल्हा परिषद मराठी शाळांना ग्रामपंचायतीच्या वतीने ४ स्मार्ट टीव्ही संच देण्यात आले. त्यामध्ये पिंप्री सद्रोद्दिन मराठी शाळेसाठी 2 स्मार्ट टीव्ही, भगतवाडी शाळेसाठी 1 स्मार्ट टीव्ही तर तारांगणपाडा शाळेसाठी 1 स्मार्ट टीव्ही संचाचा समावेश आहे. टीव्ही संचाचे वितरण माजी जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंप्री सद्रोद्दिनचे ग्रामसेवक गुलाब साळवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमजद पटेल, केंद्रप्रमुख श्रीराम आहेर, माजी सरपंच प्रकाश उबाळे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कदम, ग्रामपंचायत सदस्य संघटचे सल्लागार बबलू उबाळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संतोष पाटेकर, पुना दादा हंबीर, शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव ठाकरे, तारांगणपाडा आणि भगतवाडी शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विनोद पाटील, विलास उबाळे, योगिता हाके, चेतना गावित यांचे सहकार्य लाभले. तिन्ही शाळेतर्फे ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करण्यात आले. सूत्रसंचालन निवृत्ती नाठे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन पिंप्री सद्रोद्दिन शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!