इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
मनुष्यबळ लोकसेवा अकादमीतर्फे इगतपुरी तालुक्यातील सामाजिक सेवेचे व्रत घेतलेले डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात आला. नाशिक येथे झालेल्या विशेष समारंभात डॉ. रुपेश नाठे यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून मान्यवरांनी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. ह्या पुरस्कारामुळे अधिकाधिक समाज कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे डॉ. नाठे यावेळी म्हणाले. इगतपुरी तालुक्यात ह्या पुरस्काराबद्धल अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
नाशिक येथे सांस्कृतिक सभागृहात राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन संपन्न झाले. ह्या पुरस्कार वितरण समारंभाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून अनमोल मार्गदर्शन लाभलेले आहे. इगतपुरी तालुक्यातील डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे या युवकाला समाजसेवेचा वारसा लाभला आहे. त्याचे वडील माजी उपसभापती हरिश्चंद्र बाबुराव नाठे यांच्या समाजसेवी व्रताचा अंगीकार त्याने उत्तमरीत्या केला आहे. डॉ. रुपेश याने आतापर्यंत केलेल्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात छत्रपती शिवरायांचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी काम केले आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे छत्रपतींच्या विचारांचा गौरव असल्याचे मत डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी व्यक्त केले.
बाजार समितीचे माजी सभापती हरिश्चंद्र नाठे यांच्या संस्कारातून डॉ. रुपेश हा जनसेवा आणि सामाजिक कार्यामध्ये तन मन धनाने सहभागी होत असतो. लोकांच्या सेवेसाठी लोकांमध्ये राहायला आणि संपर्क साधायला मिळावा म्हणून त्याने डॉक्टर म्हणून पदवी घेतली. ह्या माध्यमातून संपूर्ण इगतपुरी तालुक्यात डॉ. रुपेश ह्याच्या कार्याचा दरवळ पसरला आहे असे गौरवोद्गार पुरस्कार वितरण प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. ह्या महत्वपूर्ण पुरस्काराबद्धल इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी डॉ. रुपेश नाठे यांचे अभिनंदन केले आहे.