
इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धन कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ घटनाकार, कायदेपंडित, बहुजनांचा नेता, महामानव एवढेच नाही तर ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.।म्हणून डॉ. आंबेडकर यांचे विचार आजच्या परिस्थितीमध्ये जशास तसे लागू होतात. त्यांच्या विचारांची जयंती साजरी होणे आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे फयांनी निर्माण केलेल्या साहित्याचं चिंतन मनन करून जयंती साजरी करावी असे म्हटले.
निष्णात अर्थतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार आणि आणि प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान देत असताना डॉ. मोहन कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आर्थिक दृष्टिकोन आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये देशापुढील प्रश्न ओळखून ब्रिटिश भारतातील कर, महसूल, बँकिंग व्यवस्था, मध्यवर्ती बँकेची स्थापना, भारतीय रुपयाचा प्रश्न, चलनाचे विनिमय पद्धती आणली. रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी कोणत्या विनिमय पद्धतीचा अवलंब करावा याबाबत तत्कालीन परिस्थितीत बाबासाहेबांनी अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्रामध्ये शिक्षण घेतले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे चिंतन मनन करून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणे संयुक्तिक आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा. एस. बी. फाकटकर, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. सी. पाटील यांनी मानले.